नामदेवांनी आपल्याला प्रयाणाविषयी काही निश्चित योजना मनाशी तयार केली होती. आपल्या निकटवर्ती जिवलगांना ती सांगितलीही होती. पंढरीनाथ सहवासासाठी जन्मभर आटाआटी केल्यावर अखेर त्याच्याच पायाशी विश्रांती मिळावी हीच त्यांची इच्छा होती. प्रत्यक्ष देवालयात नाही, तर निदान देवालयाच्या दारात तरी आपण चिरशांती घ्यावी. असा त्यांच्या मनाचा संकल्प होता. संत नामदेवांनी पंढरीनाथाच्या देवालयाच्या महाव्दारात समाधी घेतली. त्यांच्या समाधीची जागा आज ‘नामदेवांची पायरी’ म्हणून दाखविण्यात येते. विठ्ठलाच्या चरणाजवळ नित्य राहण्याचे स्वप्न नामदेवांनी असे साकारले.
Bhuwnesh Pathak –
Amazing book