श्री दासायन

श्री अनंतदास कट्टर समर्थ सांप्रदायिक होते ,पण अंधश्रद्ध व भोळेभाबडे नव्हते .समर्थ वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते.त्यांनी सुमारे हजारपानी समर्थ चरित्र तीन खंडात लिहून काढले.हे तीनही खंड अनेक वर्षे उपलब्ध नव्हते. माझे मित्र श्री.दिलीप महाजन या तीनही खंडांचे एकत्रीकरण करून हा अद्भूत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.एका अर्थाने हा ग्रंथ समर्थ संप्रदायाचा ज्ञानकोषच आहे.रामायणावरून दासायन हा शब्द तयार केला असल्यामुळे रामायणाप्रमाणे सप्तकांडात्मक असे हे चरित्र आहे.-सुनील चिंचोलकर

400.00

Out of stock

SKU: d60d72486f39 Categories: , ,

समर्थ वाङ्मयाचे परिशीलन करताना जुन्या पिढीतील सुपरिचित निष्ठावान रामदासी वै.अनंतदास रामदासी महाराज यांच्या सप्तकांडात्मक श्री दासायनचे अध्ययन फार मोलाचे वाटते, कारण ते केवळ लेखक नव्हते;व्यावसायिक साहित्यिक तर नव्हतेच नव्हते .ते समर्थ संप्रदायातील साधक,समर्थांचे भक्त व अभ्यासू उपासक होते ,आपल्या आराध्य विभूतीचा म्हणजे श्री समर्थ वाङ्मायाचा अनेक वर्षांचा व्यासंग त्यांनी परिश्रमपूर्वक व श्रद्धेने केला .त्याचे फलित म्हणजे हादासायन हा ग्रंथ होय.-आचर्य किशोरजी व्यास .श्री अनंतदास रामदासी हे मोठे समर्थभक्त व समर्थ साहित्याचे व्यासंगी,अभ्यासक संपादक होते. समर्थ हे त्यांचे दैवतच होते .समर्थांनी समाजाला बलोपासना शिकविली.त्याच्यातील लोप पावलेला स्वाभिमान प्रज्वलीत केला.समाज व राष्ट्र यासाठी निरभिलाष व समर्पित वृत्तीने काम करण्याची प्रेरणा दिली.म्हणूनच गेली चारशे वर्षे अनंतदासांसारखे तपस्वी लोक समर्थांच्या कक्षेत एकरूप होऊन गेले.-राम शेवाळकर.श्री अनंतदास कट्टर समर्थ सांप्रदायिक होते ,पण अंधश्रद्ध व भोळेभाबडे नव्हते .समर्थ वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते.त्यांनी सुमारे हजारपानी समर्थ चरित्र तीन खंडात लिहून काढले.हे तीनही खंड अनेक वर्षे उपलब्ध नव्हते. माझे मित्र श्री.दिलीप महाजन या तीनही खंडांचे एकत्रीकरण करून हा अद्भूत ग्रंथ प्रसिद्ध करत आहेत.एका अर्थाने हा ग्रंथ समर्थ संप्रदायाचा ज्ञानकोषच आहे.रामायणावरून दासायन हा शब्द तयार केला असल्यामुळे रामायणाप्रमाणे सप्तकांडात्मक असे हे चरित्र आहे.-सुनील चिंचोलकर