बाप्पा मोरया

मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया!
गणेशाचे अवतार,उपासना,व्रते आणि माहात्म्य सांगणारे,त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक!

मराठी जनमानसावर अधिराज्य गाजवणाऱ्या दैवताविषयीच्या माहितीचे डोळस संकलन म्हणजे बाप्पा मोरया! श्री गणपती गणांचा -बलवानांचा अधिपती. ज्ञान – विज्ञान यांचे प्रत्यक्ष स्वरूप.सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी.आनंदाचा कंद. मंगलाचा कर्ता आणि विघ्नांचा हर्ता.भारतातील या अतिप्राचीन दैवताविषयी मराठी माणसाला जे अनन्य साधारण प्रेम आहे त्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. गणेशाचे अवतार,उपासना, व्रते व माहात्म्य सांगणारे व त्याविषयीच्या सर्व शंकांचे समाधान करणारे माहितीपूर्ण व संग्राह्य पुस्तक !