डॉ.सच्चिदानंद सुरेश शेवडे
एम.फील., पी.एच.डी.
* जन्म- ९ नोव्हेंबर १९६१ बलिप्रतिपदा
* व्याख्याता, प्रवचनकार आणि साहित्यिक असा दुर्मिळ असणारा त्रिवेणी संगम. * चित्रदर्शी शैलीत विषय मांडणी, त्यामुळे श्रोत्यांच्या दृष्टीसमोर हुबेहूब चरित्र उभे
करण्यात यश.
* आजवर गेल्या ३५ वर्षात भारत आणि विदेशात मिळून एकूण ४५००च्या वर कार्यक्रम संपन्न.. आणि ४५ पुस्तके प्रकाशित.
* जहाज, विमान व बसमध्ये व्याख्याने देण्याची अनोखी कामगिरी, सेल्युलर तुरुंगात व्याख्यान देणारा पहिलाच वक्ता...गेली १० वर्षे सातत्याने तेथे, सावरकर स्मृतीदिनी व्याख्यान देत असतात... स्वित्झर्लंडमधील माउंट टिटलीस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर बर्फात उभे राहून उपस्थितांना 'शिवराय' ऐकवले.. इटलीतील व्हेनिस या तरंगत्या शहरातील सेंट मार्क स्क्वेअरवरून 'स्वामी विवेकानंद' सांगितले. दुबई, लंडन, मॉरिशस, सिडनी, मेलबर्न, कोलंबो, नुवारा एलिया आदी ठिकाणी कार्यक्रम संपन्न...
* एबीपी माझा, जय महाराष्ट्र, मी मराठी आदी मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत
नेहमी सहभाग.
* साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुशाफिरी
आत्ता पर्यंत प्रकाशित
*कादंबरी- रक्तलांच्छन, अघोरवाडा
*ललित चरित्रे- आद्य शंकराचार्य, नरेंद्र ते विवेकानंद, वासुदेव बळवंत, चापेकर पर्व, क्रांतिकारक राजगुरू (मराठी व हिंदी), ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज.
*बालसाहित्य- गुरु आणि शिष्य भाग १ व २
*कुमार साहित्य- कथाबोध, कथाकुसुम, वासुदेव बळवंत फडके, खुदिराम बोस, मदनलाल धिंग्रा, सरदार उधमसिंग, भगतसिंग
*ऐतिहासिक- काश्मीरनामा, वंद्य वंदेमातरम, .आणि सावरकर, शोध श्रीलंकेचा
*संकीर्ण- निवडक मुक्तवेध, वाचा आणि गप्प बसा, राष्ट्रजागर, आता तरी जागे व्हा, डोळे उघडा, अवघे धरू सुपंथ, प्रहार, मुक्तवेध, सेक्युलर्स नव्हे फेक्युलर्स, सत्य सांगा ना..!, वाटा आपल्या संस्कृतीच्या.
*धार्मिक- श्री चिंतामणी विजय कथासार, बाप्पा मोरया, मनाचिये द्वारी
*भावानुवाद- अद्भुत शक्तिचा खजिना, भारतीय यात्री, मिशन वैष्णोदेवी सहलेखन- (दुर्गेश परुळकर यांच्यासह) शिवरायांची युद्धनीती, पानिपतचा रणसंग्राम, गोवा मुक्तीसंग्राम, सावरकर-ज्ञात आणि अज्ञात
*(डॉ.परीक्षित शेवडे यांच्यासमवेत) जमात ए पुरोगामी, राममंदिरच का? पाकिस्तान विनाशाकडून विनाशाकडे
* वंद्य वंदेमातरम या पुस्तकाला म.सा.प.चा इतिहास विषयक ग्रंथलेखनाचा पुरस्कार
* क्रांतिकारक राजगुरू या पुस्तकाला वंदना प्रकाशनाचा चरित्र ग्रंथाचा पुरस्कार
*सीडी- - समरगाथा, विजयगाथा
* ...आणि सावरकर आणि प्रहार या पुस्तकांचे प्रकाशन अंदमानातील सेल्युलर तुरुंगात केले.
* वाचा आणि गप्प बसाचे प्रकाशन मॉरिशस तर सावरकर-ज्ञात व अज्ञातचे प्रकाशन लंडन येथील तृतीय सावरकर विश्व संमेलनात केले..सत्य सांगा ना चे प्रकाशन सिडनी येथे चतुर्थ सावरकर विश्व संमेलनात झाले..
* पु.भा. भावे स्मृती समितीतर्फे देण्यात येणाऱ्या पु. भा. भावे वक्तृत्व पुरस्काराने सन्मानित, रत्नागिरी कीर्तन कुलाकडून सन्मानपत्र अर्पण, कल्याण-डोंबिवली महापौर पुरस्कार प्राप्त, लोकमत समूहाने २०१३ मध्ये 'आयकॉन ऑफ ठाणे’ म्हणून सन्मानित केले, उत्तुंग परिवार-विलेपार्ले यांचे तर्फे स्वा. सावरकर राष्ट्रविचार प्रसारक पुरस्कार प्राप्त, जुलै-२०१६ मध्ये व्यास क्रिएशन्स-ठाणे कडून 'व्यासरत्न' पुरस्काराने सन्मानित, नोव्हेंबर २०१६ मुंबई साहित्य संघा तर्फे संत व अध्यात्मिक लेखनासाठी पुरस्काराने सन्मानित, २०१८ मध्ये टिळकनगर शिक्षण संस्था-डोंबिवली तर्फे सावरकर पुरस्काराने सन्मानित.. २०१९ श्रद्धेय अशोकजी सिंघल स्मृती पुरस्कार, आम्ही सारे ब्राह्मण पक्षिकाच्यावतीने 'ब्राह्मणभूषण' पुरस्कार.
Reviews
There are no reviews yet.