Look Inside

केल्याने देशाटन

(1 customer review)

व्यावसायिक भूमिकेतून प्रवास करणारा एक अवलिया, त्याने केलेले आटोपशीर पण आगळेवेगळे प्रवासवर्णन म्हणजे ” केल्याने देशाटन …”

130.00

SKU: 6500fa9f1c35 Category:

प्रवासवर्णन हा प्रकार मराठी साहित्याला नवीन नाही . पण हौशी पर्यटक किंवा वार्षिक पर्यटक अशा भूमिकेतून केलेल्या प्रवासापेक्षा व्यावसायिक भूमिकेतून गेली अनेक वर्षे सातत्याने …अगदी महिन्याला १५ -२० दिवस …प्रवास करणे हे कष्टप्रद आणि कंटाळवाणे ठरेल . ठरू शकते . पण एक अवलिया याला अपवाद असू शकतो . अशा अवलियाने केलेले आटोपशीर पण आगळेवेगळे प्रवासवर्णन म्हणजे ” केल्याने देशाटन …”

Binding

Paperback

Language

Marathi

Pages

Weight

Author

चन्द्रशेखर टिळक

1 review for केल्याने देशाटन

  1. Sushama parchure

    #सक्तीचीसुटी_सत्कारणी🙏🙏😊

    साधारण चार दिवसापूर्वी माझ्या मेसेंजरमधे मेसेज (.तसं एकदोनदा मेसेंजर मधे एकमेकांच्या पोस्ट संबधी बोलणं झालं होतं)….तुम्हाला माझी पुस्तकं पाठवावी असं वाटतंय…जरा address द्याल का?…
    इती..श्री.चंद्रशेखर टिळक…इतकी बडी असामी…विचारतेय😇 नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता….आणि तसंही त्यांच्या पोस्ट ची मी फॅन आहेच…😍मग मी माझा address आणि माझ्याबरोबर सुनील चा फोन नं शेअर केला….
    त्यांनीही त्यांचा फो नं दिला…दोन दिवसात पुस्तकं हजर…’केल्याने देशाटन’.. ‘मल्हार मनाचा’.. ‘जन्म झुला’…’मनातलं …मनातचं’…’मोदी अर्थ कारण’…

    कोरोनाची सक्ती ची सुटी..आज पहीला दिवस..तसं TV शी आमचं वाकडंच…मग आयतं खाद्य मिळालं आम्हा दोघांना…आम्ही फिरस्तीवाले…मग पहिली पसंती..
    #केल्याने_देशाटनला…
    टिळकांचं लिखाण मी नेहमी वाचतेच त्यातून माणूस अर्थकारण..
    Taxation ह्या रुक्ष विषयातला असला तरी कवी मनाचा आहे हे जाणवायचं …

    पण हे पुस्तक खुप काही सांगुन जातं त्यांच्याविषयी..
    कामानिमित्त केलेल्या प्रवासात आलेले अनुभव..बरेवाईट…
    भेटलेली माणसं..
    बरी/वाईट…चांगल्या माणसांचा (त्यात Twinkle khanna Hariprasad..Shivkumar Sharma, Bhimsen,Kapil dev ,Vengsarkar,Ratan Tata, Murali Deora) आवर्जुन केलेला उल्लेख तर काही खवटांचे नामनिर्देशन नाही…ठिकठिकाणी खाल्लेले पदार्थ…
    त्याचे प्रदेशाप्रमाणे प्रकार त्याचं वर्णन…
    पुर्वांचल नव्हे उत्तमांचल….हे सारं डोळाभर पहातोय असंच जाणवत रहातं…माणूस उत्तम संस्कार व चवदार रसना यांचा मालक आहे हे सतत जाणवतं…घरात आई व पत्नी दोघी सुगरण असल्याची साक्ष असल्याचे detailing तेही ओघवत्या शैलीत…त्यांनीच लिहिलेलं त्यांच्या आईचं वाक्य…वाचन ही कृती नसुन संस्कृती असते …पानोपानी ही संस्कृती हात जोडून स्वागत करते….

    ह्या पुस्तक वाचनाची गंमत बरं का…या कोरोना सुटीत मी काही राहिलेली कामं करत असताना सुनील मोठ्याने हे पुस्तक वाचत होते आणि मी काम उरकत ऐकत होते…टिळक सर जोडीनी वाचन केलं बरं..😃
    मला लहानपणापासून कोणी वाचून दाखवलं किंवा तोंडानी कथन केलं तर परफेक्ट डोक्यात रहातं…
    आठवी पर्यंत चा अभ्यास..आईनी अभ्यासाची पुस्तकं वाचून दाखवायची आणि मी खेळत किंवा चित्र काढत ऐकायची असाच केला….त्यावरच मार्क्स मिळवले…
    आज परत लहानपणीची आठवण झाली….

    एक पुस्तक वाचून संपलं..छान काहीतरी वाचल्याचं समाधान😊 उद्या दुसरं पुस्तक …

    सुषमा परचुरे
    २१.३.२०२०

Add a review