प्रवासवर्णन हा प्रकार मराठी साहित्याला नवीन नाही . पण हौशी पर्यटक किंवा वार्षिक पर्यटक अशा भूमिकेतून केलेल्या प्रवासापेक्षा व्यावसायिक भूमिकेतून गेली अनेक वर्षे सातत्याने …अगदी महिन्याला १५ -२० दिवस …प्रवास करणे हे कष्टप्रद आणि कंटाळवाणे ठरेल . ठरू शकते . पण एक अवलिया याला अपवाद असू शकतो . अशा अवलियाने केलेले आटोपशीर पण आगळेवेगळे प्रवासवर्णन म्हणजे ” केल्याने देशाटन …”
You are previewing: केल्याने देशाटन

Related Products
-
काश्मीर₹200.00
-
राममंदिर अयोध्येचे… केंद्र विश्वचैतन्याचे
₹150.00₹120.00 -
स्नेहज्योत₹150.00
-
-
केल्याने देशाटन
व्यावसायिक भूमिकेतून प्रवास करणारा एक अवलिया, त्याने केलेले आटोपशीर पण आगळेवेगळे प्रवासवर्णन म्हणजे ” केल्याने देशाटन …”
₹130.00
Binding | Paperback |
---|---|
Language | Marathi |
Pages | |
Weight | |
Author |
चन्द्रशेखर टिळक |

चन्द्रशेखर टिळक
26 May 1960• निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष, एनएसडीएल समूह.
• एनएसडीएल, सेबी, मुंबई शेअरबाजार अशा भारतीय गुंतवणूक क्षेत्रातील नामांकित संस्थात ३२ वर्षांहून जास्त काळ उच्चपदस्थ अधिकारी.
• एकूण ४० वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत.
• देशांतील अनेक नामवंत शिक्षण-प्रशिक्षण संस्थात मानद व्याख्यता आणि त्यांच्या अनेक समित्यांत सभासद.
• विविध आर्थिक व गुंतवणुक विषयांवर देशभरात ३५०० व्याख्याने व इतर सर्व विषय मिळून आजपर्यंत ४५०० हून जास्त व्याख्याने.
• आजपर्यंत २८ पुस्तकें आणि ३२०० हून जास्त लेख प्रसिद्ध.
• १९८८ सालापासून सातत्याने अर्थसंकल्प विश्लेषण. २०२३ साली कै. मा. श्री. नानी पालखीवाला यांचा याआधीचा याबाबतचा विक्रम पार.
• आर्थिक विषयांवरील पुस्तक, लेख, भाषणे याबद्दल तीन माजी पंतप्रधान (अटलबिहारी वाजपेयी, नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग) यांचे विशेष निमंत्रण व प्रत्यक्ष भेटीत प्रदीर्घ चर्चा.
• आधी लेख व नंतर ‘मला भावलेले गुलजार’ या पुस्तकाबद्दल स्वतः गुलजार यांच्याकडून प्रशंसा अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित.
आजपर्यंत प्रकाशित झालेल्या २८ पुस्तकांचा तपशील....
गुंतवणूक विषयक
१. शेअर ललित - गुंतवणूक विषयक वेगळ्या धाटणीचा डिसेंबर २०२२, मध्ये प्रकाशित झालेला लेखसंग्रह, मोरया प्रकाशन.
२. गुंतवणूक पंचायतन, राजहंस प्रकाशन, सध्या १४ वी आवृत्ती सुरू.
३. मार्केट मेकर्स, राजहंस प्रकाशन, तिसरी आवृत्ती सुरू, मसाप पुरस्कार विजेते पुस्तक.
४. गुंतवणूक गुरु(*)
५. गुंतवणूक तुमचीही माझीही(*)
आर्थिक
६. अर्थानुभुती - अर्थ विषयक भाषणांचा संग्रह, संवेदना प्रकाशन.
७. मोदी अर्थकारण : नीती आणि रणनीती, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन.
८. अर्थसंकल्प, पाचवी आवृत्ती, मैत्रेय प्रकाशन(*)
९. अर्थानुभव, पाचवी आवृत्ती, मैत्रेय प्रकाशन(*)
१०. अर्थसंकल्प (*)
११. The Budgetary Measures ....Thinkline (*)
ललित लेख
१२. मला भावलेले गुलजार- स्वतः गुलजार यांनी गौरवलेले पुस्तक, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन
१३. शब्द-शेखरी जानेवारी २०२३ मध्ये प्रकाशित, मोरया प्रकाशन.
प्रवास वर्णन ( जरा हटके)
१४. केल्याने देशाटन, सध्या दुसरी आवृत्ती सुरू, मोरया प्रकाशन
कथा - संग्रह
१५. स्नेहज्योत, नोव्हेंबर २०२२ मधे प्रकाशित, मोरया प्रकाशन
१६. मनापासून, संवेदना प्रकाशन
१७. भावमग्न, संवेदना प्रकाशन
१८. तरतम, संवेदना प्रकाशन
१९. अर्थस्वर, संवेदना प्रकाशन
२०. जन्मझूला, संवेदना प्रकाशन
२१. मल्हार मनाचा, दुसरी आवृत्ती, मोरया प्रकाशन
२२. मनातलं मनातच, दुसरी आवृत्ती, कौशिक प्रकाशन(*)
कविता - संग्रह
२३. भावतरंग, मोरया प्रकाशन(*)
२४. थेंब थेंब आयुष्य, संवेदना प्रकाशन(*)
२५. वही आयुष्याची, संवेदना प्रकाशन(*)
२६. मनरंगी ... संवेदना प्रकाशन(*)
२७. लगोरी ... संवेदना प्रकाशन(*)
२८. अस्तित्व .... संवेदना प्रकाशन(*)
*आता विक्रीसाठी उपलब्ध नाहीत.
1 review for केल्याने देशाटन
-
Rated 5 out of 5
Sushama parchure –
#सक्तीचीसुटी_सत्कारणी
साधारण चार दिवसापूर्वी माझ्या मेसेंजरमधे मेसेज (.तसं एकदोनदा मेसेंजर मधे एकमेकांच्या पोस्ट संबधी बोलणं झालं होतं)….तुम्हाला माझी पुस्तकं पाठवावी असं वाटतंय…जरा address द्याल का?…
इती..श्री.चंद्रशेखर टिळक…इतकी बडी असामी…विचारतेयनाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता….आणि तसंही त्यांच्या पोस्ट ची मी फॅन आहेच…
मग मी माझा address आणि माझ्याबरोबर सुनील चा फोन नं शेअर केला….
त्यांनीही त्यांचा फो नं दिला…दोन दिवसात पुस्तकं हजर…’केल्याने देशाटन’.. ‘मल्हार मनाचा’.. ‘जन्म झुला’…’मनातलं …मनातचं’…’मोदी अर्थ कारण’…कोरोनाची सक्ती ची सुटी..आज पहीला दिवस..तसं TV शी आमचं वाकडंच…मग आयतं खाद्य मिळालं आम्हा दोघांना…आम्ही फिरस्तीवाले…मग पहिली पसंती..
#केल्याने_देशाटनला…
टिळकांचं लिखाण मी नेहमी वाचतेच त्यातून माणूस अर्थकारण..
Taxation ह्या रुक्ष विषयातला असला तरी कवी मनाचा आहे हे जाणवायचं …पण हे पुस्तक खुप काही सांगुन जातं त्यांच्याविषयी..
कामानिमित्त केलेल्या प्रवासात आलेले अनुभव..बरेवाईट…
भेटलेली माणसं..
बरी/वाईट…चांगल्या माणसांचा (त्यात Twinkle khanna Hariprasad..Shivkumar Sharma, Bhimsen,Kapil dev ,Vengsarkar,Ratan Tata, Murali Deora) आवर्जुन केलेला उल्लेख तर काही खवटांचे नामनिर्देशन नाही…ठिकठिकाणी खाल्लेले पदार्थ…
त्याचे प्रदेशाप्रमाणे प्रकार त्याचं वर्णन…
पुर्वांचल नव्हे उत्तमांचल….हे सारं डोळाभर पहातोय असंच जाणवत रहातं…माणूस उत्तम संस्कार व चवदार रसना यांचा मालक आहे हे सतत जाणवतं…घरात आई व पत्नी दोघी सुगरण असल्याची साक्ष असल्याचे detailing तेही ओघवत्या शैलीत…त्यांनीच लिहिलेलं त्यांच्या आईचं वाक्य…वाचन ही कृती नसुन संस्कृती असते …पानोपानी ही संस्कृती हात जोडून स्वागत करते….ह्या पुस्तक वाचनाची गंमत बरं का…या कोरोना सुटीत मी काही राहिलेली कामं करत असताना सुनील मोठ्याने हे पुस्तक वाचत होते आणि मी काम उरकत ऐकत होते…टिळक सर जोडीनी वाचन केलं बरं..
मला लहानपणापासून कोणी वाचून दाखवलं किंवा तोंडानी कथन केलं तर परफेक्ट डोक्यात रहातं…
आठवी पर्यंत चा अभ्यास..आईनी अभ्यासाची पुस्तकं वाचून दाखवायची आणि मी खेळत किंवा चित्र काढत ऐकायची असाच केला….त्यावरच मार्क्स मिळवले…
आज परत लहानपणीची आठवण झाली….एक पुस्तक वाचून संपलं..छान काहीतरी वाचल्याचं समाधान
उद्या दुसरं पुस्तक …
सुषमा परचुरे
२१.३.२०२०
Add a review Cancel reply
You must be logged in to post a review.
Sushama parchure –
#सक्तीचीसुटी_सत्कारणी


साधारण चार दिवसापूर्वी माझ्या मेसेंजरमधे मेसेज (.तसं एकदोनदा मेसेंजर मधे एकमेकांच्या पोस्ट संबधी बोलणं झालं होतं)….तुम्हाला माझी पुस्तकं पाठवावी असं वाटतंय…जरा address द्याल का?…
नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता….आणि तसंही त्यांच्या पोस्ट ची मी फॅन आहेच…
मग मी माझा address आणि माझ्याबरोबर सुनील चा फोन नं शेअर केला….
इती..श्री.चंद्रशेखर टिळक…इतकी बडी असामी…विचारतेय
त्यांनीही त्यांचा फो नं दिला…दोन दिवसात पुस्तकं हजर…’केल्याने देशाटन’.. ‘मल्हार मनाचा’.. ‘जन्म झुला’…’मनातलं …मनातचं’…’मोदी अर्थ कारण’…
कोरोनाची सक्ती ची सुटी..आज पहीला दिवस..तसं TV शी आमचं वाकडंच…मग आयतं खाद्य मिळालं आम्हा दोघांना…आम्ही फिरस्तीवाले…मग पहिली पसंती..
#केल्याने_देशाटनला…
टिळकांचं लिखाण मी नेहमी वाचतेच त्यातून माणूस अर्थकारण..
Taxation ह्या रुक्ष विषयातला असला तरी कवी मनाचा आहे हे जाणवायचं …
पण हे पुस्तक खुप काही सांगुन जातं त्यांच्याविषयी..
कामानिमित्त केलेल्या प्रवासात आलेले अनुभव..बरेवाईट…
भेटलेली माणसं..
बरी/वाईट…चांगल्या माणसांचा (त्यात Twinkle khanna Hariprasad..Shivkumar Sharma, Bhimsen,Kapil dev ,Vengsarkar,Ratan Tata, Murali Deora) आवर्जुन केलेला उल्लेख तर काही खवटांचे नामनिर्देशन नाही…ठिकठिकाणी खाल्लेले पदार्थ…
त्याचे प्रदेशाप्रमाणे प्रकार त्याचं वर्णन…
पुर्वांचल नव्हे उत्तमांचल….हे सारं डोळाभर पहातोय असंच जाणवत रहातं…माणूस उत्तम संस्कार व चवदार रसना यांचा मालक आहे हे सतत जाणवतं…घरात आई व पत्नी दोघी सुगरण असल्याची साक्ष असल्याचे detailing तेही ओघवत्या शैलीत…त्यांनीच लिहिलेलं त्यांच्या आईचं वाक्य…वाचन ही कृती नसुन संस्कृती असते …पानोपानी ही संस्कृती हात जोडून स्वागत करते….
ह्या पुस्तक वाचनाची गंमत बरं का…या कोरोना सुटीत मी काही राहिलेली कामं करत असताना सुनील मोठ्याने हे पुस्तक वाचत होते आणि मी काम उरकत ऐकत होते…टिळक सर जोडीनी वाचन केलं बरं..
मला लहानपणापासून कोणी वाचून दाखवलं किंवा तोंडानी कथन केलं तर परफेक्ट डोक्यात रहातं…
आठवी पर्यंत चा अभ्यास..आईनी अभ्यासाची पुस्तकं वाचून दाखवायची आणि मी खेळत किंवा चित्र काढत ऐकायची असाच केला….त्यावरच मार्क्स मिळवले…
आज परत लहानपणीची आठवण झाली….
एक पुस्तक वाचून संपलं..छान काहीतरी वाचल्याचं समाधान
उद्या दुसरं पुस्तक …
सुषमा परचुरे
२१.३.२०२०