केल्याने देशाटन
व्यावसायिक भूमिकेतून प्रवास करणारा एक अवलिया, त्याने केलेले आटोपशीर पण आगळेवेगळे प्रवासवर्णन म्हणजे ” केल्याने देशाटन …”
नर्मदा परिक्रमा:एक आनंदयात्रा
आविष्कार नर्मदेच्या सौंदर्याचा ! अनुभव नर्मदा काठच्या प्रेमाचा आणि “माणूस” नावानं जगणाऱ्या तिथल्या देवाचा !
मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष
नवरात्रात माता वैष्णोदेवीवरील हे पुस्तक नक्की वाचा !! जम्मू आणि काश्मीरचे पूर्व राज्यपाल श्री.जगमोहन यांच्या Reforming Vaishno Devi and a case for Reformed,Reawakened and Enlightened Hinduism इंग्रजी ग्रंथाचा भावानुवाद डॉ.सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे तो मिशन वैष्णोदेवी-संघर्ष आणि उत्कर्ष या शीर्षकाने . या ग्रंथात राज्यपालांच्या मर्यादेत राहूनही जनोपयोगी कार्य कसे करता येते हे जगमोहन यांनी दाखवून दिले आहे.कतरा पासून वैष्णोदेवी पर्यंतचा परिसर व ते देवस्थान आपल्या अधिकारांचा उपयोग करून त्यांनी रम्य आणि देखणे बनविले आहे…त्यासाठीचा संघर्ष आणि त्याचे फळ म्हणजे आज त्या देवस्थानाचा झालेला उत्कर्ष त्यांनी या ग्रंथात मांडला आहे.या शिवाय त्यांना अभिप्रेत असलेल्या हिंदू धर्माची संकल्पना त्यांनी यात ग्रथित केली आहे.आज आपले पंतप्रधान नरेन्द्र मोदी प्रमुख देवस्थानांच्या विकासाच्या गोष्टी बोलत आहेत तेव्हा त्यांच्यासमोर रोलमॉडेल म्हणून वैष्णोदेवी संस्थान नक्कीच असेल.